वास्तव्य:

मुंबई, अमेरिका, नाशिक

भ्रमणध्वनी:

+91 9869043016

इमेल:

yotiambekar@gmail.com

Published

03/03/2024

No Comments

Join the Conversation

रामदास स्वामी आज असते तर त्यांनी त्यांच्या त्या सुप्रसिद्ध वचनात नक्कीच बदल केला असता. ‘जागी सर्व सुखी असा कोण आहे’ या अध्याहत सवालाऐवजी ते म्हणाले असते, ‘जागी ताणतणाव नाही असा कोण आहे!’

आमचं वृत्तनिवेदनाचं आणि वृत्तसंपादनाचं कामही याला अपवाद नाही. पण तसं म्हटल तर बरेच जणांना ते पटणार नाही. त्यांना वाटत, वृत्तनिवेदनाचं काम ते काय! बातमीदारानं आणलेली बातमी नुसती वाचायची. छानसा मेकअप करायचा. झुळझुळीत कपडे घालायचे. चेहऱ्यावर हसू खेळवत माईकसमोर बसायचं. मग काय, डोळ्याची पापणी लवायच्या आत वृत्तनिवेदिकेची छबी आणि आवाज सर्वत्र पोचतात. आहे काय अन नाही काय! वस्तुस्थिती अशी रम्य असती तर काय हवं होतं! पण ती तशी नाही हीच वस्तुस्थिती आहे. वृत्तनिवेदनाचं आणि संपादनाचं काम मुळातच ताणतणावाच आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी सहा अशा आखीव रेखीव वेळापत्रकाला तेथे थाराच नाही. ‘उद्या’ हा शब्दच त्याच्या गावी नाही. आज.. आत्ता… ताबडतोप… या तीन शब्दांवर बातम्यांच जग चालत. छे! चालत कसलं धावत!

कारण बातमी म्हटली कि, ती कशी तव्यावरच्या पोळीसारखी ताजी, गरम हवी अशी सर्वांची अपेक्षा असते. प ती ‘इन्स्टेंट फुड’ प्रमाणे रेडीमेड पाकिटातून सहजपणे मिळत नसते. ती मिळवावी लागते. पण मिळाली तरी जशीच्या तशी वापरता येत नाही. बातमीदाराकडून आलेल्या बातमीवर वृत्तसंपादकाला संस्कार करावे लागतात. बातमीपत्राच्या वेळेच्या मर्यादेत या बतामिसः इतर बातम्याही जायच्या असतात. वृत्तसंपादक प्रसंगीकातेनुसार बातम्या निवडतो. अशा रीतीनं संपादन विभागातून तयार झालेली बातमी वृत्तनिवेदिकेच्या हातात पडते.

बातमीपत्र योग्य रीतीने सदर होण्यात बातमीदार, वृत्तसंपादक आणि निवेदक यांचा समान हिस्सा आणि जबाबदारी असते. त्यामुळे निवेदकाला आपल्या दोन्ही सहकार्यांची कामं यायला हवीत. जोडीला इंग्रजीतून मराठीत भाषांतर करण्याची सवय हवी. बातमीचं निवेदन हि स्वतंत्र कला आहे. तुमची भाषा चांगली आहे म्हणून तुम्हाला बातमीचं लेखन, संपादन आणि वाचन जमेल याची खात्री देता येत नाही. यातून वृत्तनिवेदकाची जबाबदारी थोडी जास्त आहे. तो बातमीदार आणि वृत्तसंपादक यांना नैतिकरित्या बांधील असतो. त्यानं बातमी चांगली वाचली नाही तर त्या दोघांच्या मेहनितीवर पाणी पडत. हे काम म्हणजे पायात पाय असा प्रकार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चौकशी करा
चौकशी करा