वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणून ज्योती अंबेकर महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९६७ रोजी परंडा (जिल्हा उस्मानाबाद) येथे झाला. तसेच त्यांचे शालेय शिक्षण लातूर येथील देशिकेंद्र विद्यालय आणि दयानंद महाविद्यालय येथे झाला. बी. कॉम. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद) येथे पत्रकारिता अभ्यासक्रमातील पदवी (बी.जे.) मिळविली. केंद्र सरकारच्या भारतीय सेवेतील त्या (आयआयएस्) माजी अधिकारी आहेत. सौ. ज्योती अंबेकर या दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर वृत्तसंपादक होत्या.
सौ. ज्योती अंबेकर ह्या सह्याद्री वाहिनीवर गेल्या १२-१३ वर्षे बातम्या देत होत्या. संयतपणे प्रेक्षकांना समजेल अशारीतीने त्यांचे बातमी पत्राचे वाचन असायचे. त्यात कोठेही कृत्रिमता किंवा नाटकीपणा नसायचा म्हणूनच त्यांचे वृत्तनिवेदन लोकांना नेहमीच आवडायचे. बातम्या वाचणे, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे, मुलाखती घेणे हा त्यांचा छंद किंवा आवडीचा भाग नेहमीच होता आणि आजही आहे. मुळात मराठवाड्यातील ग्रामीण भागातून येऊन त्यांनी ‘आवाजा’ च्या क्षेत्रात केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आपल्यातील अंगभूत गुणांना चांगले वळण देऊन आपल्याला पाहिजे त्या गोष्टी साध्य करता येतात, याचे ज्योती अंबेकर या उत्तम उदाहरण आहेत. सौ. ज्योती अंबेकर यांनी दूरदर्शनमध्ये सहज म्हणून वृत्तनिवेदकासाठी अर्ज केला आणि लेखी परीक्षा, मुलाखत, स्क्रीन टेस्ट अशा रीतसर प्रक्रियेनंतर बारा हजार इच्छुक अर्जदारांमधून त्यांची प्रथम क्रमांकाने निवड झाली होती. बोलण्याचे आपले कौशल्य अधिक धारदार करण्यासाठी आवाज जोपासना शास्त्राचा अखेरचा शब्द म्हणून ओळखले जाणारे डॉ. अशोक रानडे यांचाकडे ज्योती अंबेकर यांनी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आणि त्या प्रशिक्षणच्या शिदोरीवर आणि त्याआधारे भरपूर मेहनत घेऊन त्यांनी स्वतःला घडविले आणि ‘निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत’ या संवाद-कलेच्या प्रांतात त्या एक मानदंड ठरल्या.
वृत्तनिवेदक, कार्यक्रम सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणून सुपरिचित असलेल्या सौ. ज्योती अंबेकर यांनी भारतीय माहिती सेवेत अधिकारी म्हणून काम केले आहे. सौ. ज्योती अंबेकर यांनी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात वृत्तसंपादक म्हणून देखील काम केले आहे आणि तसेच त्या दूरदर्शनच्याही वृत्तसंपादक होत्या. मराठवाड्यातून येऊन मुंबईच्या आणि एकूणच राज्याच्या सांस्कृतिक आणि विशेषत: सूत्रसंचालन क्षेत्रात स्वत:चे विशेष स्थान त्यांनी निर्माण केले आहेच पण दूरदर्शनवर वृत्तनिवेदन करनाऱ्या त्या मराठवाड्यातील पहिल्या निवेदक होत्या. इतकेच नव्हे तर एकाचवेळी वृत्तनिवेदन आणि वृत्तसंपादन करणार्यात त्या दूरदर्शनच्या इतिहासातील एकमेव अधिकारी होत्या. अनौपचारिक, खेळकर आणि प्रसन्नता ही त्यांच्या सूत्रसंचालनाची वैशिष्ट्ये होती. संवाद कौशल्याशी संबंधित कार्यशाळेमधून मार्गदर्शन आणि प्रासंगिक लेखन करणे हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र आहे. विशेषत:सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रांशी संबंधित जाहीर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, तज्ञांच्या जाहीर मुलाखती, चर्चासत्रांचे समन्वयन यातील त्यांचे कौशल्य नेहमीच वाखाणले जाते.
नेहमीच प्रसन्न आणि हसतमुख असणाऱ्या ज्योती अंबेकर यांचे व्यक्तिमत्व लोभसवाणे आहे. आपल्या संवाद कौशल्याच्या बळावर त्यांनी आतापर्यंत शेकडो जाहीर कार्यक्रमांचे सूत्र संचालन केले आहे. गेल्या १५ वर्षातील सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शास्त्रज्ञ, संपादक, वकील, डॉक्टर्स, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अशा बहुतेक सर्व क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तींच्या त्यांनी जाहीर ‘लाईव्ह’ मुलाखती घेतल्या आहेत. अगदी सहजपणे पण स्वतः कमी बोलत मुलाखतकर्त्यांकडून लोकांना आवश्यक असलेली उपयुक्त माहिती काढून घेण्याच्या त्यांच्या कौशल्याबद्दल त्या वाखाणल्या जातात.
लेखक: चंद्रकला कुलकर्णी
‘अंतरिचा दिवा’ या माझ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपला आणि मी घरी आले. शेजारच्या सूर्यवंशी काकू, सुनेसह भेटायला आल्या.
‘छान झाला म्हणे कार्यक्रम. ज्योती अंबेकर कार्यक्रमाला होत्या म्हणे. त्या दूरदर्शनवाल्या ज्योती अंबेकर का?
“हो त्याच”
“मग काय कार्यक्रम चांगला होणारच. मुद्दाम मुंबईहून कार्यक्रमाला येणं ही लहान गोष्ट नाही, बरं चंद्रकला तुझं नशीबच चांगलं.”
लेखक: अजय अंबेकर
एखादं काम शिकून घेतल्यानंतर पुन्हा तेच काम करण्यात लहानपणापसून मात्र कधीच रुची वाटली नाही. सतत नव्या गोष्टींचा शोध घेणं आणि त्या करता येतील का ते अजमावण, याचं मोठं आकर्षण तेव्हाही होतं आणि अजूनही ते कायम आहे. या हव्यासापोटी शाळेत असताना अभ्यसाबरोबर खो-खो,कबड्डी,नाटक,नाच,स्काउट- गाईड आणि अन्य मैदानी खेळांत भाग घेण, सारखं बक्षीस घरी घेऊन येणं हे आवडायला लागलं. हेच सत्र पुढे लातूरच्या दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सुरु राहिलं, पण यात आणखी एका गोष्टीची भर पडली ती म्हणजे महाविद्यालातल्या कार्यक्रमांचं वृत्तांकन करायचं आणि स्थानिक दैनिकात छापायला द्यायचं. यातूनच पुढे माझ्या करिअरने आकार घेतला.
लेखक: अजय अंबेकर
ज्योतीला मी प्रथम पहिले औरंगाबादमध्ये. मी त्यावेळी तिथे लोकमतमध्ये उपसंपादक म्हणून नोकरी करत होतो. ज्योती त्यावेळी जर्नलीझम करत होती. अधूनमधून लोकमतच्या ऑफिसमध्ये लेख वगैरे घेऊन यायची. लोकमतमध्ये त्यावेळी जे ट्रेनी होते त्यांचा मी सिनीअर होतो. तर त्यांच्यात ज्योतीबद्दल चर्चा होत असे. असे मी रात्रीला असल्याने माझी तिची तोपर्यंत भेट झाली नव्हती. पण मीही लग्नासाठी मुलीच्या श्होधात होतो. माझा एक मित्र मोहन राठोड हा सुद्धा जर्नलीझमच करत होतं. मी मुलीच्या शोधात असल्याचं त्याला माहित होतं.त्याची आणि ज्योतीचीही ओळख होतीच. त्यानं सजेस्ट केलं कि ‘ज्योती तुझी चांगलीच मैत्रीण होऊ शकते’ तेंव्हा मी त्याला म्हटलं ‘ओळख करून दे’. आमची हि चर्चा अशोक पडबिन्द्रींच्या कानावर गेली होती...
लेखक: अजय अंबेकर
‘मी नांदेडचा ’ असं सांिगतल्यावर समोरचा जर
मराठवाड्याच्या सांस्कृितक क्षेातील घडमोड�ंशी थोडाफार
प�रिचत असेल, तर लगेच �वचारतो, ‘मग ग. ना. अंबेकर तुमचे
कोण?’. त्याच्या ात बदल करण्याचे थेट न सुच, मी
उ�रतो, ‘(ते माझे कोण असं सांगण्यापेक्षा उलट मी सां-) मी
त्यांचा नात’. माझ्या उरातलं ममर् समोरच्याला समजलं आ
का, याचा अंदाजघेण्यासाठ मी क्षणभर त्याच्या चेहयार
पाहातो.
लेखक: प्रतीक्षा परिचारक
गप्पागोष्टी, माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाबरोबरच महिलांनी स्वतः ज्ञान समृद्ध होणे महत्त्वाचे आहे तसेच नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे असे मत सुप्रसिद्ध निवेदिका, सूत्रसंचालिका, मुलाखतकार “ज्योती अंबेकर” यांनी व्यक्त केले. त्या शहरात एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या.
लेखक: शिवानी जोशी
लातूर सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेत घेत लातूर औरंगाबाद व्हाया गोवा अलिबाग मुंबई असा प्रवास, प्रवासाप्रमाणेच करिअरचा ग्राफही चढती कमान सांगतोय हे करिअर आहे “ज्योती अंबेकर” यांचे. पाच मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार सांभाळणाऱ्या वडिलांनी शिक्षणाचं व स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न कायम बिंबवलं. त्यामुळे ज्योतीला शिक्षणासाठी वडिलांनी कधीच नाही म्हटलं नाही परंतु ग्रॅज्युएट झाल्यानंतर जर्नलिझमचा कोर्स लातूर सारख्या ठिकाणी उपलब्ध नव्हता आणि ज्योतीने लातूरमध्ये छोटे-मोठे वृत्तांत वृत्तपत्रात लिहिणं सुरू केलं होतं तिथेच जर्नलिझम करावं असं बऱ्याच जणांनी सुचवलं देखील होतं आणि काहीतरी शिकायचं आहेच स्वतःच्या पायावर उभे राहायचं आहेत तर औरंगाबादला जाऊन ते शिकवा अशी इच्छाही बळावू लागली होती.
लेखक: मधुरा अन्वीकर
काही करिअरची क्षेत्रे वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे आपल्याला नेहमीच आकर्षित करतात. प्रसिद्धी माध्यमे ही नेहमीच यात अग्रेसर राहिली आहेत. वर्तमानपत्रे, दूरदर्शन, रेडिओ विविध प्रसारण वाहिन्या आणि त्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल सर्वसामान्य लोकांना नेहमीच कुतूहल वाटत असते. घराघरात पोहोचून पूर्ण जगाचे वर्तमान सांगणारा दूरदर्शन संच १९७०-७१ पासून लोकप्रियतेची एक एक पायरी चढत्या क्रमाने सर करीत आहे. वाहिन्यांच्या अस्तित्वाने या क्षेत्रातही आधी निकोप आणि नंतर जीव घेण्यास स्पर्धेला सुरुवात झाली। छोट्या गोष्टींचे पर्यवसन “ब्रेकिंग न्यूज” मध्ये करणाऱ्या वाहिन्यांच्या गदारोळात सह्याद्री वाहिनीच्या बातम्या आजही विश्वासाहर्तेमुळे आवर्जून घराघरात पाहिल्या जातात. या बातम्या सांगणारा सर्व परिचित चेहरा म्हणजे “ज्योती अजय अंबेकर”
लेखक: ———
प्रश्न- आपलं बालपण कसे गेलं त्या दिवसाच्या काही आठवणी सांगू शकाल का ?
सौ. ज्योती अंबेकर – पारंपारिक कुटुंबात मी मोठी झाले. परंतु, शिक्षणाचे महत्त्व आई-वडिलांनी आम्हाला वेळीच पटवून दिले होते. घरात शिस्तीचे पण व्यक्तिमत्व विकासाला पूरक वातावरण लाभल्यामुळे आम्ही बहिणी व भाऊही सर्वार्थाने घडलो. आज मी आई झाल्यावर मला समजतं मुलांना वाढवणं किती जबाबदारीचे काम असते.
लेखक: सौ शैलजा सुनील धोकटे
प्रसिद्धी माध्यमे करिअरच्या दृष्टीने तरुण-तरुणींना नेहमीच आकर्षित करीत असतात. या माध्यमातून विशेषतः दूरदर्शन तसेच प्रसार वाहिन्यात काम करणाऱ्या लोकांचे ही सर्वसामान्यांना आकर्षण असते. प्रसार माध्यमांची वाढती स्पर्धा, निर्माण झालेला जीवघेणा संघर्ष ही आपण अनुभवतो, तरीही आज सर्वसामान्यांच्या विश्वासाहर्तेला उतरलेली वाहिनी म्हणजे “सह्याद्री वाहिनी.” या वाहिनीवरील बातम्यांची विश्वासाहर्ता, भारताची प्रतिमा, आंतरराष्ट्रीय नातेसंबंध, सामाजिक बांधिलकी इत्यादींवर दिला जाणारा भर यामुळे सह्याद्रीने “सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी” हे घोषवाक्य सार्थ केलेले आहे. या वाहिनीवर वृत्तसंपादन आणि वृत्त निवेदक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणारी व्यक्ती म्हणजे ज्योती अजय अंबेकर.
लेखक: अजय अंबेकर
त्यावेळी औरंगाबादच्या लोकमतमध्ये आम्हा दहा-बारा परीक्षार्थी तरुण पत्रकारांचा एक उत्साही गट होता. त्यांच्यातील काही जणांच्या बोलण्यात ज्योतीचा उल्लेख असायचा. त्यातल्या दोघांनी विद्यापीठात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला होता आणि ज्योती विद्यापीठातील वसतिगृहात राहून तोच अभ्यासक्रम करत होती. नोकरीच्या प्रयत्नात ती एक दोन वेळा लोकमतला आली होती. मी रात्रपाळीला असल्याने तिला पाहिलेलं नव्हतं.
प्रकाशनाचे नाव: महाराष्ट्र टाइम्स
दिनांक: २ डिसेंबर २०१०
एम्टी नेस्टच्या प्रॉब्लेमला तोंड देण्यासाठी दूर जाणारी मुलंच आई-बाबांची त्यासाठी तयार करण्याइतकी मॅच्युअर झाली आहेत…
ही गोष्ट अशाच एका लेकीची, तिच्या आईला ‘मोठं’ करणारी.
प्रकाशनाचे नाव: चिंतन आदेश
दिनांक: दिवाळी २०१०
रामदास स्वामी आज असते तर त्यांनी त्यांच्या त्या सुप्रसिद्ध वचनात नक्कीच बदल केला असता. ‘जागी सर्व सुखी असा कोण आहे’ या अध्याहत सवालाऐवजी ते म्हणाले असते, ‘जागी ताणतणाव नाही असा कोण आहे!’
प्रकाशनाचे नाव: ———
दिनांक: ———
एखादं काम शिकून घेतल्यानंतर पुन्हा तेच काम करण्यात लहानपणापसून मात्र कधीच रुची वाटली नाही. सतत नव्या गोष्टींचा शोध घेणं आणि त्या करता येतील का ते अजमावण, याचं मोठं आकर्षण तेव्हाही होतं आणि अजूनही ते कायम आहे.
प्रकाशनाचे नाव: चिंतन आदेश
दिनांक: दिवाळी २०१३
‘चिंतन आदेश’ च्या दिवाळी अंकाचे विषय नेहमीच मनाला स्पर्शून जाणारे असतात. मी नियमितपणे या दिवाळी अंकासाठी लिखाण करण्यामागे कदाचित ते प्रमुख कारण असाव. बोलण्याच्या क्षेत्रात काम करणं म्हणजे मुलाखत घेणं,...
प्रकाशनाचे नाव: चारचौघी
दिनांक: वार्षिक २०१३
लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमात मी वृत्तांत लिहीत असे. त्यावेळी मी लिहिलेल्या चार ओळी जरी छापून आल्या तरी अवर्णनीय आनंद व्हायचा. या लिखाणाला पुढे प्रोत्साहन मिळत गेलं आणि पत्रकारितेतच काहीतरी करायचं असं ठरवलं...
प्रकाशनाचे नाव: चिंतन आदेश
दिनांक: दिवाळी २०११
स्वतःच्याच प्रेमात पडलेली किंवा स्वतःचंच म्हणणं खरं असणाऱ्या (करणाऱ्या नव्हे) समजुतीत वागणारी व्यक्ती ओळखण्याची एक सोपी युक्ती आहे. ही युक्ती आपण स्वतःसाठीही उपयोगात आणू शकतो. असं करायचं, त्यां व्यक्तीच्या किंवा आपल्या बोलण्यात (अर्थात लिहिण्यातसुद्धा) कितीवेळा ‘मी’,’माझे’,’मला’ हे शब्द येतात ते मोजायचं....
प्रकाशनाचे नाव: चिंतन आदेश
दिनांक: दिवाळी २००९
दूरदर्शनच्या वृत्त विभागामध्ये गेली ८ ते १० वर्षे भाषांतरकार वार्ताहर, वृत्तनिवेदक, वृत्तसंपादक म्हणून काम करीत असताना भारत सरकारच्या एका जबाबदार आणि अत्यंत विश्वासू च्यानेलमध्ये आपण काम करीत आहोत, याचा रास्त अभिमान आणि समाधान मी अनुभवत गेले.
प्रकाशनाचे नाव: ———
दिनांक: ———
एकता कपूर कधी आमच्या घरी आली तर भलतीच खट्टू होईल. आमच्या घरी सास-बहू प्रोब्लेम मुळी नाहीच! मुंबईत आमचं घर सरकारी नियमाशी इमान राखत तिघांचंच असलं, तरी नांदेडला माझ्या सासरच्या घरी चांगलं पंधरा-वीस माणसांचं एकत्र कुटुंब आहे. तिथं ‘चार दिवस सासूचे-सुनेचे’ असला ‘ड्रामा’ नसला, तरी नाट्य मात्र जरूर आहे....
2 years ago
2 years ago
10 years ago
10 years ago