ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा
तुम्ही आम्हाला हवे आहात
ज्येष्ठ नागरिक आणि सध्याची पिढी यांच्यातील वाद-संवाद, ज्येष्ठांची समाजाला आणि कुटुंबाला असलेली गरज आणि आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची आवश्यकता, उतारवयातील मानसिक आणि शारीरिक समस्या अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ नागरिकांना समजावून घेणे आणि तज्ञांमार्फत त्यावर मार्गदर्शन करणे असा या कार्यशाळेचा हेतू आहे. जगण्याच्या व्यवहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक करण्यासाठी आनंददायी संवाद साधणार्या या कार्यशाळेत तज्ञांची व्याख्याने, मुलाखती, गप्पा समाविष्ट होऊ शकतात. ज्योती अंबेकर या कार्यशाळेचे संयोजन आणि सूत्रसंचालन करतात. वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करता येते.