ग्राहकहित | दिवाळी 2006 | अजय अंबेकर
ज्योतीला मी प्रथम पहिले औरंगाबादमध्ये. मी त्यावेळी तिथे लोकमतमध्ये उपसंपादक म्हणून नोकरी करत होतो. ज्योती त्यावेळी जर्नलीझम करत होती. अधूनमधून लोकमतच्या ऑफिसमध्ये लेख वगैरे घेऊन यायची. लोकमतमध्ये त्यावेळी जे ट्रेनी होते त्यांचा मी सिनीअर होतो. तर त्यांच्यात ज्योतीबद्दल चर्चा होत असे. असे मी रात्रीला असल्याने माझी तिची तोपर्यंत भेट झाली नव्हती. पण मीही लग्नासाठी मुलीच्या श्होधात होतो. माझा एक मित्र मोहन राठोड हा सुद्धा जर्नलीझमच करत होतं. मी मुलीच्या शोधात असल्याचं त्याला माहित होतं.त्याची आणि ज्योतीचीही ओळख होतीच. त्यानं सजेस्ट केलं कि ‘ज्योती तुझी चांगलीच मैत्रीण होऊ शकते’ तेंव्हा मी त्याला म्हटलं ‘ओळख करून दे’. आमची हि चर्चा अशोक पडबिन्द्रींच्या कानावर गेली होती. एकदा गप्पांमध्ये त्यांनी मला विचारला ‘तू ज्योतिषी लग्न का करत नाही?’ तेंव्हा मी त्यांना माझी-तिची ओळख नसल्याच सांगितलं. तेंव्हा ते म्हणाले ‘फार चांगला होईल तुमचा लग्न झालं तर’ नंतर मी विचार केला, जर हे मध्ये पडले तर आपला डायरेक्ट अप्प्रोच राहणार नाही. त्यापेक्षा आपणच आधी तिच्याशी ओळख करून घ्यावी. ती त्यावेळी होस्टेलवर राहत होती. आमचा मित्र मोहनही विद्यापीठात मुलांच्या होस्टेलमध्ये राहत होता.त्याच्या रूमवर गेलो. त्यावेळी मी इकॉनॉमिकस घेऊन एक्स्टर्नली एम. ए. करत होतो. विद्यापीठात त्या क्लासेससाठी जात असे. तर क्लासला जाण्यापूर्वी मोहनला घेऊन ज्योतीला भेटायला गेलो. तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी सांगितलं मी आकाशवाणीवर काज्युअल म्हणून काम करतोय, तुम्ही का लिहित नाही, आकाशवाणीत का येत नाही वगैरे विचारलं. त्या भेटीतच ती मला आवडली होती. एकदोनदा भेटी झाल्या. जर्नलीझमला माझी १- २ लेक्चर्स झाली. इतर प्राध्यापकांकडूनही ती माझ्याबद्दल ऐकून होती. अंबेकर लोकमतला आहेत, गोल्ड मेडलीस्ट आहेत, वगैरे वगैरे. त्यामुळे तिच्या मनात माझ्याबद्दल एक चांगली प्रतिमा होती.
नंतर एकेदिवशी रविवारी सकाळी लोकमतला गेलो तर ज्योतीला तिथे बघून चक्रावलोच. पडबिन्द्रींनी तिला बोलावलं होतं. पडबिन्द्रींनी तिला केबिनमध्ये बोलावलं. मी मनात विचार केला, एक तर आपण खुलेपणानी तिच्याशी बोललेलो नाही. फक्त ओळख करून घेतलीये. पडबिन्द्रीं काय म्हणतात याची ग्यारण्टी नाही, त्यामुळे मी फार अपसेट झालो. १५-२० मिनिटांनी ज्योती त्यांच्या केबिनमधून बाहेर आली. तिचा चेहरा अगदी गोरामोरा झाला होता . त्याचवेळेस मोहनही तेथे होता. त्याने तिला ‘सोडायला बसस्टोपपर्यंत चल’ म्हणून सांगितलं, तो गेला. आल्यावर मी विचारला तर मोहन म्हणाला ‘अरे पडबिन्द्रीं काय म्हणाले ते सांगायला मी तयार नाही, पण ‘तुझ्या मित्रानं असं करायला नको होतं पडबिन्द्रींनी मला कशाला बोलावलं?’ वगैरे ती म्हणत होती. त्याचदिवशी संध्याकाळी मला तिचा फोन आला. आपण भेटूयात म्हणाली. मग भेटलो तेंव्हा खुलासा झाला की, पडबिन्द्रींनी तिला इंटरव्ह्यूला बोलावलं असल्याचा तिचा समाज झाला होता पण त्यांनी तर घरगुती गप्पा मारत तिची सगळी माहिती विचारली. तिला थोडा रागच आला होतं हे असं सगळं का विचारताहेत? तसं तिनं त्यांना विचारलाही, तेंव्हा ते म्हणाले कि आमच्याकडे एक मुलगा तुझ्यात इंटरेस्टेड आहे. ती आणखीनच अपसेट झाली. तेंव्हा ते म्हणाले, विचारतोय अशासाठी की तुझा दुसर्या कुणात इंटरेस्ट असेल तर हा प्रश्नच मिटला. तेंव्हा ज्योती म्हणाली, ‘नाही तसं काही नाहीये, माझी मोठी बहिण अजून लग्नाची आहे, मला अजून पुढे करियर करायचय.’ पण तिनं त्याचवेळेस पडबिन्द्रींना विचारलं ‘आता एवढा सगळा विचारला आहे तुम्ही मला, तर त्या मुलाचं नावही सांगून टाका!’ तेंव्हा सुरुवातीला त्यांनी ‘अजून कशातच काही नाही’ म्हणून आढेवेढे घेतले. पण ज्योतीनं फारच आग्रह केला तेंव्हा त्यांनी माझ नाव सांगून टाकलं.
मी ही त्या भेटीत तिला सांगितला होतं की, मी काही पडबिन्द्रींना तुला विचारायला सांगितला नव्हतं, त्यांनी परस्पर विचारलय.मग त्याच रात्री ती लातूरला आईवडिलांकडे गेली. त्यांना सगळं सांगितलं. तिथून परत आल्यावर तिनं आईवडिलांचा होकार असल्याचं सांगतानाच स्वत:ला विचार करण्यासाठी वेळ मागून घेतला. त्याचवेळी ज्योती अंबेकर सांगू लागल्या ‘जर्नलीझम करताना मी अम्बेकरांच लेक्चर कधीच अटेंड केला नव्हतं. माझं एक साधा स्वप्न होतं. एम.जे. पी.एच.डी. करून करियर करायचं आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळायची. त्याचवेळी अम्बेकरांबद्दल गुडलुकिंग, गोल्ड मेडलीस्ट, लोकमत मध्ये आहेत वगैरे बर्याच चर्चा ऐकत होते. पूर्वी कधी अशा गोष्टींवरून हुरळून जाणं अनुभवला नव्हतं आणि जेंव्हा आमच्या कॉमन मित्राला – मोहनला आंबेकरांनी माझ्याशी ओळख करून देण्याविषयी सुचवलं तेंव्हा मोहन अम्बेकारांना म्हणाला ‘बघ बाबा, ती एकदम स्त्रेट फोरवर्ड आहे’ तरीही आंबेकरांनी तयारी दाखवली तेंव्हा मला वाटलं ‘असावं? पण त्यांनी पहिल्या भेटीतच पक्क ठरवल होतं आणि…?’ पुढे अंबेकर सांगू लागले ‘आणि १३ एप्रिल १९८८ ला औरंगाबादच्या सुभेदारी रेस्टहाउस मध्ये आम्ही दोघांनी फक्त तीनशे रुपयांत रजिस्टर लग्न केलं. माझे आई-वडील, मामा, आजोबा, तिचे आई-वडील आणि दोघांच्या १०-१२ मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत, अतिशात साधेपणान, कोणताही रुसवा फुगवा न होता हे लग्न झालं!
त्यानंतर ज्योतीनं जर्नलीझम आणि इतर परीक्षा दिल्या. लोकमतला तिच्या मेरीटवर ती नोकरीला लागली. मला गव्हर्नमेंट जॉब मिळल्यान मी लोकमत सोडून दिल्लीला आकाशवाणीत गेलो. ज्योतीचाही नंतर काज्युअल अन्नौन्सार न्यूजरीडर म्हणून अलिबागला आलो. ते १९८९ साल होतं. नंतर गोव्याला ला मी महाराष्ट्र परिचय केंद्र या महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयात प्रमुख म्हणून जॉईन झालो. गोव्याला आल्यावर काही दिवस ज्योतीकडे नोकरी नव्हती. पण तिला मी शांत बसू दिलं नव्हत. वाचन वगैरे चालू ठेवायला सांगितला होतं. वास्तविक तिच्या माहेरी वाचन – लेखनाचं फारसं वातावरण नव्हतं. ज्योतीला बोलायला आवडतं, खेळ, थट्टा – मस्करीकडे तिचा जास्त ओढ आहे. पण तिचं ड्राफ्टइंग चांगलं होतं. तरी त्या ५ बहिणी १ भाऊ होते. कॉलेजमध्ये असतानाही ज्योती नोकरी करत होतीच. ताबडतोप पैसा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून ती जर्नलीझमकडे वळली. आताही गोव्यात मी तिला गोमंतक मध्ये नोकरीचं विचारायला सांगितलं. पण गोमंतकच्या संपादकांनी सध्या उपसंपादकासाठी जागा नाही, प्रुफरीडिंग करणार असाल तर या म्हणून सांगितलं. ती जरा संभ्रमात पडली पण मी तिला सांगितला कि, कुठलंही काम कमी महत्वाचं नसतं. उलट तुझा पाया पक्का होईल आणि तुझ्यातले गुण हेरून ते तुला उपसंपादक म्हणून लायक समाजतील. त्यावेळी बी.जे. झालेला उपसंपादक कुणीच नव्हता.तिलाही अनुभव मिळून सहा-सात महिन्यांनी ती उपसंपादक झाली. त्याचवेळी युपीएससी चाही तिचा इंटरव्ह्यू झाला होतं. पण त्यावेळी गोव्यासारख्या प्रदेशात महाराष्ट्राबद्दल आपण अपडेट होत नाही म्हटल्यावर आणि ज्योतीच्या दृष्टीनं पुण-मुंबई सारख्या ठिकाणी जॉब मिळाला तर बरं म्हणून मी बदली मागितली. त्यावेळी सातार्यात जागा दिली होती म्हणून तिथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून जॉईन झालो. ज्योतीला ५-६ महिन्यांनंतर पुण्याला प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोमध्ये पोस्टिंग मिळाली. अलिबागला असताना आम्हाला मुलगी झाली. पुण्यात तिचा राहण्याचा प्रश्न होता. त्यावेळी ती होस्टेलला राहत होती. मुलीकडे माझी व तिची आई बघत असे. करियर करायचं म्हणून ती पुणे-सातारा विकली अप-डाऊन करत होती. त्यावेळी तिची मनस्थिती कशी असेल याची कल्पना करता येईल. नंतर वर्षभरान माझी बदली पुण्याला झाली. त्याकाळात पी.आय.बी. चं काम तिनं चांगलं केलं. दोन वर्ष मी पुण्यात होतो नंतर मुंबईला मुख्यमंत्री कार्यालयात माझी बदली झाली. त्यावेळी मी मुंबई ला जायला खरतर उत्सुक नव्हतो. पण एका गाफील क्षणी मी त्यासाठी माझा विलिंगनेस दिला होता. या पोस्टसाठी सिलेक्शन होतं का ते मला बघायचं होतं पण वरिष्ठांच्या आदेशामुळे जावंच लागलं. वाहतूक, गर्दी हे मला नकोसं वाटत होतं. १९९६ ला मुंबईत आलो. २-३ महिन्यांनी ज्योतीचीही पी.आय.बी.ला बदली झाली. त्यावेळी मी तिला सुचवाला कि, दूरदर्शन जवळच आहे तिथे शनिवार रविवार किंवा इतर वेळी काम करत जा. तिथलं कामही तिला जमू लागलं आणि नंतर पी.आय.बी. मधून तिचं प्रमोशन झालं. इंफोर्मेशन असिस्तंसच्या पोस्टवरून इंफोर्मेशन ऑफिसर झाली आणि नंतर दूरदर्शनला तिची बदली झाली. हे सगळं करताना तिला या क्षेत्रातल्या दोघा-तिघांचं वाचन, आवाजाच्या जोपासानेबद्दल मार्गदर्शनही चांगलं मिळालं आणि आता तिथेही तिचं काम व्यवस्थित आहे.
हे सगळं मी सांगायचंकारण एक मराठवाड्यातली मुलगी, भाषेचा (टोन) प्रश्न, आवडीचा, अनुभवाचा प्रश्न असताना, mindset तसं नसताना तिनं प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर अभ्यास करून हे सगळं मिळवलं. मराठवाड्यातल्या लोकांना एकप्रकारचा न्यूनगंड असतो, एक्स्पोजर काहीच नसतं पण कष्टाने तिनं सगळं साध्य केलं. सूत्रसंचालनही ती चांगलं करते. स्वभावतःच मिस्किलपणा, हजरजबाबीपणा आहे. लाघवी व्यक्तिमत्व, स्पष्टवक्तेपणा आणि मृदू बोलणं असं कॉम्बिनेशन तिच्यात आहे. तिच्या या गुणांवरच तिनं मराठवाडा भूषण पुरस्कारही नुकताच मिळवला आहे. हे सगळं साध्य करण्यात अम्बेकारांचा कसा वाटा आहे हे ज्योती अंबेकर सांगू लागल्या. त्यानंतर काही दिवसाननंतरचा प्रसंग – अंबेकर दुपारी घरी जेवायला येत नसत. पण अचानक त्या दिवशी आले तर मी स्वयंपाकघरात काहीतरी करतच होते . त्यांनी मला हाताला धरून बाहेरच्या खोलीत आणलं, आपल्या शेजारी बसवल आणि म्हणाले, ‘लग्न झाल्यापासून बघतोय मी, जेंव्हा पाहावं तेंव्हा तू आपली किचनमध्ये काहीतरी करत असतेस. तू एवढी शिकलेली आहेस, लेखन वाचन करतेस, कॉलेजमध्ये वेगवेगळ्या activities मध्ये बिझी असायचीस, हे तुझे गुण आवडले म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आणि आता यापैकी तू काहीच करताना दिसत नाहीस, लिहिताना दिसत नाहीस, बाहेर जाऊन नवीन काही बघून आली नाहीस. किचानमध्ये सारखं येवढं काय करत असतेस?’ जी बाई सदैव किचनमध्ये अडकलेली राहील ती स्वत:ची आणि कुटुंबाची वाढ कशी करणार?’ ही अम्बेकरांची फिलोसॉफी. तेव्हा किचनमधून आधी बाहेर पड. आपला जन्म खाण्यासाठी आहे का?ते वडे –सामोसे नसले तरी चालतील. आदल्या दिवशीची पोळीही मला चालेल. मी तक्रार करणार नाही. उलट तुला मदतही करेन पण व्यक्ती म्हणून तुझा विकास व्हावा असं मला वाटत. दोन वेळेचं जेवण मिळालं बास झाल पण तुझा विचार कर. त्यांच्या या बोलण्यावर मी काही बोलले नाही पण आतून पूर्ण हादरले. त्यांना आपली बायको करियर करणारी हवी होती. मी त्यानुसार हळूहळू एवढी बदलू गेले की, परवा अचानक आमची मित्रकंपनी आली तेंव्हा बाजूच्या घराजवळच्या हॉटेलमध्ये नेलं ई जेवण झाल्यावर लांबूनच आमचं घर दाखवलं, तेंव्हा सगळे म्हणाले काय बदमाश आहे, घरी नेण (जेवायला) दूरच, बर इथे आणलं तेंव्हा आंबेकरांनी वरचा किस्सा ऐकवला आणि म्हणाले, ‘तिला मी हाताला धरून किचनमधुन बाहेर काढलं पण ती इतकी बाहेर येईल असं वाटलं नव्हतं’.
‘आता बाहेरची आणि आवडीची सगळी कामे करते, वाचन करते, अर्थात किचनमध्ये काम करते, नाही असं नाही. पण आधीची ओझी ठेवली म्हणून नवीन ओझी उचलू शकले. ती ओझी घेऊन हे शक्य झालं नसते. नवीन ओझी आनंदाने उचलतेय. पण जुनी ओझीच असती तर चेहर्यावरच हसू लोपल असतं.’
दोघांच्या कॉमन आवडीनिवडी आणि मतभेद तसचं मुलगी जयति यांच्याविषयी विचारलं तेंव्हा दोघांच्याही बोलण्यातून त्यांनी व्यक्ती म्हणून एकमेकांना खूप चांगलं जाणून घेतल्याचं जाणवलं. एकमेकांच्या स्वातंत्र्याला, विकासाला वाव देत देत मुलीलाही सर्वांगीण व्यक्तिमत्व म्हणून घडवण्याचा त्यांचं प्रयत्न आहे.
ज्योती अम्बेकारांच्या मते ‘दोघांनाही नाटक-सिनेमा पाहायला, फिरायला-जायला, वाचन करायला आवडतं. माणसांमध्ये मला मिसळायला आवडतं प ते थोडे होमली आहेत. कुणी कुठे बोलावलं कि ते आवर्जून आम्हाला दोघींना घेऊन जातात. दोघीन्बाबत तसे ते पासेसिव्ह आहेत आणि आमची कंपनीही त्यांना आवडते. पण अम्बेकारांचा भिडस्तपणा मला कधीकधी त्रासदायक वाटतो. पण ते कधीच सौम्य ई स्पष्ट शब्दात अप सागू शकतो ते न सांगितल्यान त्यांच्या कामाच्या वेळा मागे-पुढे होतात.
तर अंबेकर सांगतात, दोघांच्याही खाण्या-पिण्याच्या आवडी-निवडी समा आहेत. दोघांनाही तिखट जेवण आवडतं. शास्त्रीय संगीत दोघांनाही आवडतं. स्वभाव ज्योतीचा extrovert आहे तर माझा itrovert आहे. ज्योती आणि जयति या दोघींकडून मला खूप शिकायला मिळालं. मतभेदाचम्हणल तर ती हिशेबी आहे ई मी बेहिशेबी आहे. मी वर्कोहोलिक असल्यानं तिला त्याचा त्रास होतो. तेवढी तिची एक तक्रार असते बाकी आमचं अतिशय चांगलं जमत. तिच्या आवडीच्या विषयांवर मी तिला लिहीत करण्याचा प्रयत्न करतो पण अजून तिनं तेवढं मनावर घेतलं नाही. जयंतीला वाढवण्यात आमची भूमिका कॉम्प्लिमेंटरी असते. आम्ही व्रतवैकल्य किंवा कुळाचाराच्या आहारी गेलो नाही. या सगळ्यांमध्ये अडकून न पडतही सगळी रिलेशन्स नीट जपली कारण आमच्या याबाबतच्या भूमिका सगळ्यांना माहित आहेत. मी असं समजतो कि त्यामुळे तिचीही आम्हाला निकोप वाढ करता आली.
विचार स्वातंत्र्यच वातावरण घरात आहे. तिचे निर्णय तिनेच घ्यायचे आणि त्याच्या परिणामांची जबाबदारीही घ्यायची हे आम्ही तिला शिकवला आहे. आवश्यक ती शिस्तही तिला लावलीये. या सगळ्यात ज्योतीचा वाटा खूप महत्वाचा आहे. ती फारशी आता स्वयंपाकघरात वावरत नसली तरी ज्योतीला स्वयंपाक करण, कपड्यांना इस्त्री करण व इतर सर्व काम स्वतःची स्वतः करता आली पाहिजेत यावर तिचा कटाक्ष असतो. आता कुठे ती दहावी झालीये पण जयति आणि ज्योतीमध्ये आई-मुलगी म्हणून खूप चांगला संवाद आहे. ज्योतीला तर संवादाची हातोटी आहे. जयतीची ती जशी मैत्रीण आहे तशी माझ्या आईचीही ती चांगली मैत्रीण आहे. दोघींमध्ये एक छान नातं आहे. तुम्ही माझी आई असताना घरी बघाल तर माझी आई ज्योतीची वेणी घालताना कधी दिसेल तर कधी ज्योती आपल्या सासूच्या मांडीवर डोकं ठेऊन पडलेली आणि सासूकडून थोपटून घेतानाही दिसेल. सासू-सुनेच्या नात्यात एक पडदा असतो, मतभेद असतात तसे त्या दोघींमध्ये अजिबात नाहीत. माझी आई साने गुरुजींच्या आईसारखी! ज्योती तर तिला ज्ञानेश्वर माउली म्हणते! हे सगळं संगान्ण्यात कुठेही कृत्रिमता नाही. फोनेवर त्या एकमेकींशी बोलताना एकमेकींना एनर्जी देत असतात ई दोघीही एकमेकिंमुळे आपल्याला बळ मिळाल्याचं सांगतात. ज्योती पूर्वी खूप रंगीत होती पण आता तिनं स्वत:ला खूप बदललय, कल्टीव्हेट केलय असं अंबेकर सांगत होते तेंव्हा ज्योती आंबेकरांनी माहेरच्या वातावरणाची माहिती दिली.
‘माझे वडील स्वभावाने रंगीत आणि आई नेहमी आजारी असायची त्यामुळे लहानपणी न कळत रागीटपणा उचलला आणि आई आजारी असल्यामुळे घरातल सगळं आवरून, काम करून शाळा-कॉलेजला आम्ही जात असू. त्यामुळे स्वभावात पोक्तपणा आला होता.
त्यावेळी इतर मुला-मुलींना खेळताना-बागडताना पाहून मनात एकप्रकारचा बिटरनेस आला होता. वडील मनाने फार हळवे आणि प्रेमळ आहेत प परिस्थितीवश ते रंगीत बनले होते. पण सर्व भावंडांना सगळी काम आली पाहिजेत फर्स्ट क्लास मिळवलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा.’
आयुष्याकडून फार काही अपेक्षा नव्हत्या, अजिबातच नव्हत्या म्हटल तरी चालेल. त्यातुलनेत भरपूर मिळालाय. छोट्याश्या गोष्टींमध्ये समाधान मानायची वृत्ती आहे त्यामुळे आयुष्य समाधानात चाललाय हे अम्बेकारांच म्हणण एक सुदृढ कुटुंबाचं चित्र डोळ्यासमोर आणत.