वास्तव्य:

मुंबई, अमेरिका, नाशिक

भ्रमणध्वनी:

+91 9869043016

इमेल:

yotiambekar@gmail.com

03/03/2024 No Comments

अमृतबोला १ (६-डिसेंबर-२०१३)

मुळात बोलणं ही अनैसर्गिक क्रिया आहे. म्हणजे ती जन्मत:च आपण घेऊन येत नाही. त्यामुळे ती प्रयत्नपूर्वक शिकावी आणि शिकवावी लागते. काहींना त्यांच्यातल्या उपजत गुणांमुळे चांगलं बोलता येतं, काहींना अनुकरण करीत प्रयत्नानं शिकावं लागतं. जसं काही थोड्या नशिबवान मंडळींना जन्मत:च सुरांचं ज्ञान असतं. बोलण्याचं तसंच आहे. निसर्गत: आपल्याला सुखकारक वाटणारी अवस्था म्हणजे आडवं झोपून राहाणं. तोंड […]

03/03/2024 No Comments

माई

एकता कपूर कधी आमच्या घरी आली तर भलतीच खट्टू होईल. आमच्या घरी सास-बहू प्रोब्लेम मुळी नाहीच! मुंबईत आमचं घर सरकारी नियमाशी इमान राखत तिघांचंच असलं, तरी नांदेडला माझ्या सासरच्या घरी चांगलं पंधरा-वीस माणसांचं एकत्र कुटुंब आहे. तिथं ‘चार दिवस सासूचे-सुनेचे’ असला ‘ड्रामा’ नसला, तरी नाट्य मात्र जरूर आहे. तिथं कधी ज्योती आंबेकर आपल्या सासूबाईंच्या मांडीवर […]

03/03/2024 No Comments

दूरचित्रवाणी वाहिनीचा अनुभव – चिंतन आदेश – दिवाळी २००९

दूरदर्शनच्या वृत्त विभागामध्ये गेली ८ ते १० वर्षे भाषांतरकार वार्ताहर, वृत्तनिवेदक, वृत्तसंपादक म्हणून काम करीत असताना भारत सरकारच्या एका जबाबदार आणि अत्यंत विश्वासू च्यानेलमध्ये आपण काम करीत आहोत, याचा रास्त अभिमान आणि समाधान मी अनुभवत गेले. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अनेक विभाग आहेत. उदा. पत्रसूचना कार्यालय (बीआयबी), आकाशवाणी, दूरदर्शन, योजना मासिक, प्रकाशन विभाग, […]

03/03/2024 No Comments

इगो-फिगो टळो! आनंद-राज्य येवो! – चिंतन आदेश – दिवाळी २०११

स्वतःच्याच प्रेमात पडलेली किंवा स्वतःचंच म्हणणं खरं असणाऱ्या (करणाऱ्या नव्हे) समजुतीत वागणारी व्यक्ती ओळखण्याची एक सोपी युक्ती आहे. ही युक्ती आपण स्वतःसाठीही उपयोगात आणू शकतो. असं करायचं, त्यां व्यक्तीच्या किंवा आपल्या बोलण्यात (अर्थात लिहिण्यातसुद्धा) कितीवेळा ‘मी’,’माझे’,’मला’ हे शब्द येतात ते मोजायचं. दहा वाक्यांत दहापेक्षा जास्त वेळा हे शब्द आले तर केस गंभीर आहे, असं समाजाव. […]

03/03/2024 No Comments

पुढे जाण्यासाठी आयुष्यात शॉर्टकट वापरू नये – चारचौघी – वार्षिक २०१३

लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमात मी वृत्तांत लिहीत असे. त्यावेळी मी लिहिलेल्या चार ओळी जरी छापून आल्या तरी अवर्णनीय आनंद व्हायचा. या लिखाणाला पुढे प्रोत्साहन मिळत गेलं आणि पत्रकारितेतच काहीतरी करायचं असं ठरवलं. दैनिक लोकमत मध्ये सुरुवातीला विविध जबाबदारीची कामे पार पाडत गेले. काही चुकलं तर त्याच वेळी जाणून घेऊन त्याची दुरुस्ती केली. […]

03/03/2024 No Comments

नात्यातील समृद्धी हे आयुष्य – चिंतन आदेश – दिवाळी २०१३

‘चिंतन आदेश’ च्या दिवाळी अंकाचे विषय नेहमीच मनाला स्पर्शून जाणारे असतात. मी नियमितपणे या दिवाळी अंकासाठी लिखाण करण्यामागे कदाचित ते प्रमुख कारण असाव. बोलण्याच्या क्षेत्रात काम करणं म्हणजे मुलाखत घेणं, सूत्रसंचालन करणं , टी.व्ही., रेडीओसाठी बातम्या वाचणं किंवा वेगवेगळ्या विषयांवर व्याखानं देणं अथवा वेगवेगळी वर्कशोप्स घेणं ही माझी आवड आणि व्यवसाय आहे. आकाशावाणीसाठी वृत्तसंपादक म्हणून […]

03/03/2024 No Comments

जगाबरोबर रहाण्याचं समाधान या क्षेत्रात आहे.

एखादं काम शिकून घेतल्यानंतर पुन्हा तेच काम करण्यात लहानपणापसून मात्र कधीच रुची वाटली नाही. सतत नव्या गोष्टींचा शोध घेणं आणि त्या करता येतील का ते अजमावण, याचं मोठं आकर्षण तेव्हाही होतं आणि अजूनही ते कायम आहे. या हव्यासापोटी शाळेत असताना अभ्यसाबरोबर खो-खो,कबड्डी,नाटक,नाच,स्काउट- गाईड आणि अन्य मैदानी खेळांत भाग घेण, सारखं बक्षीस घरी घेऊन येणं हे […]

03/03/2024 No Comments

तणावाशी खेळता आलं पाहिजे – चिंतन आदेश – दिवाळी २०१०

रामदास स्वामी आज असते तर त्यांनी त्यांच्या त्या सुप्रसिद्ध वचनात नक्कीच बदल केला असता. ‘जागी सर्व सुखी असा कोण आहे’ या अध्याहत सवालाऐवजी ते म्हणाले असते, ‘जागी ताणतणाव नाही असा कोण आहे!’ आमचं वृत्तनिवेदनाचं आणि वृत्तसंपादनाचं कामही याला अपवाद नाही. पण तसं म्हटल तर बरेच जणांना ते पटणार नाही. त्यांना वाटत, वृत्तनिवेदनाचं काम ते काय! […]

03/03/2024 No Comments

यु हॅव युवर ओन फ्युचर – महाराष्ट्र टाइम्स – २ डिसेंबर २०१०

एम्टी नेस्टच्या प्रॉब्लेमला तोंड देण्यासाठी दूर जाणारी मुलंच आई-बाबांची त्यासाठी तयार करण्याइतकी मॅच्युअर झाली आहेत…ही गोष्ट अशाच एका लेकीची, तिच्या आईला ‘मोठं’ करणारी. ती जायला निघणार होती त्या दिवशी सकाळीच तिच्या रूममधलं सगळ सामान हॉलमधे सुटकेसबंद झालं होतं. सकाळची धावपळ सुरू होती. तिचे आजी-आजोबाही गावाकडून आले होते. घरात काम करणाऱ्या ताईची जयतीसाठी आवडणारे पदार्थ बनवण्याची […]

चौकशी करा
चौकशी करा