आपल्याकडील माहिती आणि निरीक्षण पोहचविण्याकरिता ज्योती अंबेकर यांनी 'संवाद-कला' ही कार्यशाळा घेण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर आणि धुळे येथे त्यांनी या कार्यशाळा घेतल्या आहेत.
‘सुख-संवाद’ हा प्रेक्षकांशी त्यांचा जिव्हाळ्याच्या विषयावर जाहीर संवाद साधण्याचा त्यांचा अनोखा उपक्रम आहे. तो तीन प्रकारांमध्ये होतो. एक केवळ महिलांसाठी- ‘आहे तुजपाशीच’, दुसरा केवळ युवक - युवतींसाठी- ‘हे दिवस फुलायचे’ आणि तिसरा केवळ जेष्ठ नागरिकांसाठी- ‘तुम्ही आम्हाला हवे आहात.’ या इंटरेक्तीव्ह कार्यक्रमात त्या आरोग्य, आहार, कौटुंबिक सौहार्द, मानसिक शांतता आणि व्यवस्थापन या विषयाचा अनुषंगाने सहभागी प्रेक्षकवर्गाशी मनमोकळा संवाद साधतात. त्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून त्यांच्याशी गप्पा मारतात. आपल्या मानतील प्रश्नांची उकल करण्यासाठी मदत व्हावी आणि जगण्याच्या व्यावहाराकडे पाहणाचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक व्हावा हा या कार्यक्रमामागचा हेतू आहे.