आपला जन्मजात आवाज बदलता येत नाही, पण या आवाजावर संस्कार करून ऐकणार्याला सुखकारक वाटेल, अशा पद्धतीने बोलण्यासाठी आपला आवाज सिद्ध करता येतो. त्याचे काही व्यायाम आहेत, काही तंत्र आहे. आवाजाचा पोत, आवाजाची पट्टी, आवाजाची पातळी, प्रमाणित उच्चार, श्वासावर नियंत्रण अशा विविध पैलूंवर ख्यातनाम संगीत तज्ज्ञ डॉ. अशोक रानडे यांच्याकडून ज्योती अंबेकर प्रशिक्षण घेतले आहे. या ज्ञानाच्या आधारे तसेच मिळालेल्या अनुभवाची त्याला जोड देऊन ज्योती अंबेकर यांनी आवाजाची जोपासना कशी करावी यावर अभ्यासपूर्ण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विवेचन करणार्या अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. या कार्यशाळेचा फायदा व्यावसायिक क्षेत्राबरोबरच अनेकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातही झाला आहे. आवाज आणि भाषा या दोन्हीची सांगड संवाद कलेसाठी आवश्यक आहे. त्या दोन्हीचेही मर्म उदाहरणांसह त्या उलगडून दाखवतात आणि प्रात्यक्षिकासह शिकवतात.