संवादाबरोबरच आपली भाषा, आपले वागणे, हातवारे, हावभाव आणि मुख्य म्हणजे विचार करण्याची पद्धत हे सर्व आपल्या व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे गुण आहेत. अनेक बुद्धिमान, कुशल आणि अनुभवी तरूण केवळ कसे वागावे हे कळत नसल्याने या सॉफ्ट स्किलअभावी परिस्थितीवर मात करू शकत नाहीत. सहज गप्पा मारत हसत खेळत टप्प्याटप्प्यानं हे स्किल्स ज्योती अंबेकर शिकवतात. शाळा, महाविद्यालये, युवक-युवतींचे गट यांना हे कौशल्य शिकण्याची संधी घेता येईल.