दिवसभराची ही कार्यशाळा म्हणजे व्याख्यान, प्रात्यक्षिके, मुलाखती यांच्या माध्यमातून सहभागी प्रशिक्षणार्थींशी हसतखेळत अनौपचारिक संवाद साधण्याचा उपक्रम आहे. संवाद साधण्याची कला अधिक विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. बोलण्यातल्या सर्वसाधारण त्रुटी घालवणे, आवाजाची पट्टी समजून घेणे, अरोह-अवरोह, प्रमाणित उच्चार, श्वासाचा उपयोग, भावनांचा वापर, संवादाचे संकेत आणि रिती आदींबाबत या कार्यक्रमात चर्चा होईल. बोलणे हा ज्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य भाग आहे अशा – विद्यार्थी, अध्यापक, वकील, डॉक्टर, टीव्ही पत्रकार, सूत्रसंचालक, विक्रेते, व्यापारी – सर्वांना ती उपयुक्त आहे.