वास्तव्य:

मुंबई, अमेरिका, नाशिक

भ्रमणध्वनी:

+91 9869043016

इमेल:

yotiambekar@gmail.com

सौ. ज्योती अंबेकर

वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणून ज्योती अंबेकर महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९६७ रोजी परंडा (जिल्हा उस्मानाबाद) येथे झाला. तसेच त्यांचे शालेय शिक्षण लातूर येथील देशिकेंद्र विद्यालय आणि दयानंद महाविद्यालय येथे झाला. बी. कॉम. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद) येथे पत्रकारिता अभ्यासक्रमातील पदवी (बी.जे.) मिळविली. केंद्र सरकारच्या भारतीय सेवेतील त्या (आयआयएस्) माजी अधिकारी आहेत. सौ. ज्योती अंबेकर या दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर वृत्तसंपादक होत्या.

एक विचारू?

सौ. ज्योती अंबेकर ह्या सह्याद्री वाहिनीवर गेल्या १२-१३ वर्षे बातम्या देत होत्या. संयतपणे प्रेक्षकांना समजेल अशारीतीने त्यांचे बातमी पत्राचे वाचन असायचे. त्यात कोठेही कृत्रिमता किंवा नाटकीपणा नसायचा म्हणूनच त्यांचे वृत्तनिवेदन लोकांना नेहमीच आवडायचे. बातम्या वाचणे, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे, मुलाखती घेणे हा त्यांचा छंद किंवा आवडीचा भाग नेहमीच होता आणि आजही आहे. मुळात मराठवाड्यातील ग्रामीण भागातून येऊन त्यांनी ‘आवाजा’ च्या क्षेत्रात केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आपल्यातील अंगभूत गुणांना चांगले वळण देऊन आपल्याला पाहिजे त्या गोष्टी साध्य करता येतात, याचे ज्योती अंबेकर या उत्तम उदाहरण आहेत. सौ. ज्योती अंबेकर यांनी दूरदर्शनमध्ये सहज म्हणून वृत्तनिवेदकासाठी अर्ज केला आणि लेखी परीक्षा, मुलाखत, स्क्रीन टेस्ट अशा रीतसर प्रक्रियेनंतर बारा हजार इच्छुक अर्जदारांमधून त्यांची प्रथम क्रमांकाने निवड झाली होती. बोलण्याचे आपले कौशल्य अधिक धारदार करण्यासाठी आवाज जोपासना शास्त्राचा अखेरचा शब्द म्हणून ओळखले जाणारे डॉ. अशोक रानडे यांचाकडे ज्योती अंबेकर यांनी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आणि त्या प्रशिक्षणच्या शिदोरीवर आणि त्याआधारे भरपूर मेहनत घेऊन त्यांनी स्वतःला घडविले आणि ‘निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत’ या संवाद-कलेच्या प्रांतात त्या एक मानदंड ठरल्या.

वृत्तनिवेदक, कार्यक्रम सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणून सुपरिचित असलेल्या सौ. ज्योती अंबेकर यांनी भारतीय माहिती सेवेत अधिकारी म्हणून काम केले आहे. सौ. ज्योती अंबेकर यांनी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात वृत्तसंपादक म्हणून देखील काम केले आहे आणि तसेच त्या दूरदर्शनच्याही वृत्तसंपादक होत्या. मराठवाड्यातून येऊन मुंबईच्या आणि एकूणच राज्याच्या सांस्कृतिक आणि विशेषत: सूत्रसंचालन क्षेत्रात स्वत:चे विशेष स्थान त्यांनी निर्माण केले आहेच पण दूरदर्शनवर वृत्तनिवेदन करनाऱ्या त्या मराठवाड्यातील पहिल्या निवेदक होत्या. इतकेच नव्हे तर एकाचवेळी वृत्तनिवेदन आणि वृत्तसंपादन करणार्यात त्या दूरदर्शनच्या इतिहासातील एकमेव अधिकारी होत्या. अनौपचारिक, खेळकर आणि प्रसन्नता ही त्यांच्या सूत्रसंचालनाची वैशिष्ट्ये होती. संवाद कौशल्याशी संबंधित कार्यशाळेमधून मार्गदर्शन आणि प्रासंगिक लेखन करणे हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र आहे. विशेषत:सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रांशी संबंधित जाहीर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, तज्ञांच्या जाहीर मुलाखती, चर्चासत्रांचे समन्वयन यातील त्यांचे कौशल्य नेहमीच वाखाणले जाते.

नेहमीच प्रसन्न आणि हसतमुख असणाऱ्या ज्योती अंबेकर यांचे व्यक्तिमत्व लोभसवाणे आहे. आपल्या संवाद कौशल्याच्या बळावर त्यांनी आतापर्यंत शेकडो जाहीर कार्यक्रमांचे सूत्र संचालन केले आहे. गेल्या १५ वर्षातील सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शास्त्रज्ञ, संपादक, वकील, डॉक्टर्स, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अशा बहुतेक सर्व क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तींच्या त्यांनी जाहीर ‘लाईव्ह’ मुलाखती घेतल्या आहेत. अगदी सहजपणे पण स्वतः कमी बोलत मुलाखतकर्त्यांकडून लोकांना आवश्यक असलेली उपयुक्त माहिती काढून घेण्याच्या त्यांच्या कौशल्याबद्दल त्या वाखाणल्या जातात.

‘ग्लॅमर’ चे दार सहज उघडणांऱ्या ज्योती अंबेकर
गौरव एका ज्योतीचा
अजय अंबेकर – साथसंगत
ऑलराउंडर
महिलांनी ज्ञान समृद्ध होणे गरजेचे
पाहता वळोनि मागे..
“ब्रेकिंग न्यूज”
गोदातीर
चेहरा (सखी)
दिलखुलास
यु हॅव युवर ओन फ्युचर
तणावाशी खेळता आलं पाहिजे
जगाबरोबर रहाण्याचं समाधान या क्षेत्रात आहे
नात्यातील समृद्धी हे आयुष्य
पुढे जाण्यासाठी आयुष्यात शॉर्टकट वापरू नये
इगो-फिगो टळो! आनंद-राज्य येवो!
दूरचित्रवाणी वाहिनीचा अनुभव
माई

1 years ago

Jyoti Ambekar
राज्य शासनाच्या मुंबईतल्या युसुफ इस्माईल महाविद्यालयात काल विद्यार्थ्यांसाठी मी आणि अजयने मिळून घेतलेली 'आवाज आणि संवाद कला' याविषयावरची कार्यशाळा यापूर्वीच्या कार्यशाळेपेक्षा अगदी वेगळा अनुभव देऊन गेली. एक म्हणजे बहुसंख्य विद्यार्थी हे हिंदी/उर्दू भाषिक आणि अल्पसंख्य समाजातले होते. दुसरं यातल्या फार कमी जणांना, आवाजाची जोपासना करायची असते आणि त्यावर संस्कार करणं आवश्यक असतं, हेच माहीत नव्हतं. त्यामुळे हिंदीत बोलणं आलं आणि आवाजासंदर्भात करावयाचे 'मराठी' व्यायाम हिंदीत करून घेणं आलं. तिसरं, दिवसभराची कार्यशाळा अडीच तीन तास बसवण्याचं कसब पणाला लागलं. पण ही विद्यार्थी मंडळी नव्या गोष्टींविषयी खूप उत्सुक असणारी, नवं शिकायची तयारी असलेली आणि भरपूर प्रश्न घेऊन जगाला सामोरं जाण्याची उमेद बाळगून असल्याचं लक्षात आलं. एक नवीन जग पाहायला मिळालं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो! धन्यवाद अंजली पेडगावकर, जोशी मॅडम, पावसकर मॅडम, प्राचार्य नरखेडे सर! धन्यवाद युसुफ इस्माईल कॉलेज! 👍🏻 ... See MoreSee Less
View on Facebook

2 years ago

Jyoti Ambekar
आई गेली. जातानाही तृप्त समाधानी आणि शांत होती.लहान वयात लग्न,अंगावर जबाबदाऱ्यांचं ओझं, दहा बाळंतपण, शरीराच्या सगळ्या अवयवांची ऑपरेशन्स झालेली असताना कधीही "गिव्हअप न करणारी", सतत हसतमुख आणि जगण्याची आस असलेली आई. तिच्या पाठीच्या मणक्याचे, दोन्ही गुडघ्यांचे, गर्भाशयाचे, दोन्ही डोळ्यांचे, मांडीच्या हाडांचे, हृदयाचे, ऑपरेशन झालेले होते पण जगण्याबाबत कधी तक्रार नव्हती. तिची सहा लेकरं म्हणजे आईचा जीव की प्राण. नेहमी म्हणायचची" मी मुलांना चांगले संस्कार दिले, उत्तम खाऊ पिऊ घातलं, माझ्या परीने जमेल तसं वाढवलं पण लेकरांनी कष्टाचं चीज केलं". "पावन झाली माझी काया" असं ती देवासमोर म्हणायची .अतिशय धार्मिक होती. आम्ही लहान असताना पहाटे चार वाजता उठून दोन तास देवपूजा करायची. तिचं म्हणणं असायचं," तुम्ही सगळे उठलात की रहाटगाटगं सुरू होतं ,त्याआधी मला शांतपणे माझं माझं देवाचं करायचं असतं". जसं जसं तिचं वय वाढत गेलं, तसं आम्ही तिला सांगायचो," थोडी उशिरा उठत जा", पण नाही, तिच्या मनाला आणि शरीराला ती सवय लागून गेली होती. नाशिकला माझ्याकडे आल्यावर पहाटे उठून शांतपणे देवाची गाणी म्हणत घरात चालायची. आमची कोणाची झोप खराब होऊ नये याची काळजी घेत असे. 77 वर्षे रसरसून जगली. तिची फुलांची , गाण्यांची , पत्ते खेळण्याची , उत्तम स्वयंपाक करून सगळ्यांना भरपूर खाऊ घालण्याची आवड आमच्या जवळ सोडून गेली. शरीरावर इतक्या सगळ्या शस्त्रक्रिया झाल्या असताना ती कधी तक्रार करायची नाही. "देवाने माझंच असं का केलं? माझ्याच नशिबाला हे का आलं?", असे शब्द तिने कधी उच्चारले नाहीत .या वयातही ती अगदी स्वच्छ आणि नीटनेटकी राहायची . खूप काही आमच्यासाठी सोडून गेली. अधिक मासाचं वाण म्हणून सगळ्या जावयासाठी आणलेली फुलपात्रे फ्रिजवर तशीच ठेवून गेली....... हे टाईप करत असतानाही डोळ्याचे अश्रू थांबत नाहीत. .....खरंच आईचं जाणं इतकं अवघड असतं का........ ... See MoreSee Less
View on Facebook

10 years ago

Jyoti Ambekar
Jyoti Ambekar's cover photo ... See MoreSee Less
View on Facebook

10 years ago

Jyoti Ambekar
Jyoti Ambekar ... See MoreSee Less
View on Facebook
चौकशी करा
चौकशी करा