अमृतबोला १ (६-डिसेंबर-२०१३)
मुळात बोलणं ही अनैसर्गिक क्रिया आहे. म्हणजे ती जन्मत:च आपण घेऊन येत नाही. त्यामुळे ती प्रयत्नपूर्वक शिकावी आणि शिकवावी लागते. काहींना त्यांच्यातल्या उपजत गुणांमुळे चांगलं बोलता येतं, काहींना अनुकरण करीत प्रयत्नानं शिकावं लागतं. जसं काही थोड्या नशिबवान मंडळींना जन्मत:च सुरांचं ज्ञान असतं. बोलण्याचं तसंच आहे. निसर्गत: आपल्याला सुखकारक वाटणारी अवस्था म्हणजे आडवं झोपून राहाणं. तोंड […]