सूत्रसंचालनाविषयी

वृत्तनिवेदक, कार्यक्रम सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणून सुपरिचित असलेल्या ज्योती अंबेकर या भारतीय माहिती सेवेच्या अधिकारी असून त्या सध्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात वृत्तसंपादक आहेत. त्या दूरदर्शनच्याही वृत्तसंपादक होत्या. मराठवाड्यातून येऊन मुंबईच्या आणि एकूणच राज्याच्या सांस्कृतिक आणि विशेषत: सूत्रसंचालन क्षेत्रात स्वत:चे विशेष स्थान त्यांनी निर्माण केले आहेच पण दूरदर्शनवर वृत्तनिवेदन करणार्यात मराठवाड्यातील त्या पहिल्या निवेदक आहेत. एवढेच नव्हे तर एकाचवेळी वृत्तनिवेदन आणि वृत्तसंपादन करणार्यात त्या दूरदर्शनच्या इतिहासातील एकमेव अधिकारी होत. अनौपचारिक, खेळकर आणि प्रसन्नता ही त्यांच्या सूत्रसंचालनाची वैशिष्ट्ये आहेत. संवाद कौशल्याशी संबंधित कार्यशाळेमधून मार्गदर्शन आणि प्रासंगिक लेखन करणे हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र आहे.विशेषत:सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रांशी संबंधित जाहीर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, तज्ञांच्या जाहीर मुलाखती, चर्चासत्रांचे समन्वयन यातील त्यांचे कौशल्य नेहमीच वाखाणले जाते.