तुम्ही आम्हाला हवे आहात...

ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा

ज्येष्ठ नागरिक आणि सध्याची पिढी यांच्यातील वाद-संवाद, ज्येष्ठांची समाजाला आणि कुटुंबाला असलेली गरज आणि आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची आवश्यकता, उतारवयातील मानसिक आणि शारीरिक समस्या अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ नागरिकांना समजावून घेणे आणि तज्ञांमार्फत त्यावर मार्गदर्शन करणे असा या कार्यशाळेचा हेतू आहे. जगण्याच्या व्यवहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक करण्यासाठी आनंददायी संवाद साधणार्या या कार्यशाळेत तज्ञांची व्याख्याने, मुलाखती, गप्पा समाविष्ट होऊ शकतात. ज्योती अंबेकर या कार्यशाळेचे संयोजन आणि सूत्रसंचालन करतात. वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करता येते.

×

आहे तुजपाशीच ...

महिला आणि युवती यांच्या म्हणून अशा वेगळ्या समस्या असतात. त्यांचे काही प्रश्न असतात.आपल्याकडील कुटंब व्यवस्थेच्या चौकटीत त्यावर मोकळेपणाने बोलता येत नाही. नातेसंबंधातून वाढलेल्या अपेक्षा, समाजाने ठरवून दिलेली चौकट, जबाबदार्यां मुळे बौद्धिक भूक भागविण्याला येणरी मर्यादा अशा विविध पैलूंसंदर्भात त्यांना समजावून घेणे आणि तज्ज्ञांमार्फत त्यावर मार्गदर्शन करणे असा या कार्यशाळेचा हेतू आहे. जगण्याच्या व्यवहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक करण्यासाठी आनंददायी संवाद साधणार्याा या कार्यशाळेत तज्ञांची व्याख्याने, मुलाखती, गप्पा समाविष्ट होऊ शकतात. ज्योती अंबेकर या कार्यशाळेचे संयोजन आणि सूत्रसंचालन करतात. वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करता येते.

×

दिवस तुझे हे फुलायचे!

युवक-युवतींच्या म्हणून अशा वेगळ्या समस्या असतात. त्यांचे काही प्रश्न असतात ज्यावर ते आपल्या आई-वडिलांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. वाढत्या वयात शारीरिक आणि मानसिक बदलांशी ते झटापट करीत असतात. किशोर वयीन मुलामुलींना पडणार्या प्रश्नांच्या विविध पैलूंसंदर्भात त्यांना समजावून घेणे आणि तज्ज्ञांमार्फत त्यावर मार्गदर्शन करणे असा या कार्यशाळेचा हेतू आहे. जगण्याच्या व्यवहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक करण्यासाठी आनंददायी संवाद साधणार्याा या कार्यशाळेत तज्ञांची व्याख्याने, मुलाखती, गप्पा समाविष्ट होऊ शकतात. ज्योती अंबेकर या कार्यशाळेचे संयोजन आणि सूत्रसंचालन करतात. वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करता येते.

×

संवाद-कला

दिवसभराची ही कार्यशाळा म्हणजे व्याख्यान, प्रात्यक्षिके, मुलाखती यांच्या माध्यमातून सहभागी प्रशिक्षणार्थींशी हसतखेळत अनौपचारिक संवाद साधण्याचा उपक्रम आहे. संवाद साधण्याची कला अधिक विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. बोलण्यातल्या सर्वसाधारण त्रुटी घालवणे, आवाजाची पट्टी समजून घेणे, अरोह-अवरोह, प्रमाणित उच्चार, श्वासाचा उपयोग, भावनांचा वापर, संवादाचे संकेत आणि रिती आदींबाबत या कार्यक्रमात चर्चा होईल. बोलणे हा ज्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य भाग आहे अशा - विद्यार्थी, अध्यापक, वकील, डॉक्टर, टीव्ही पत्रकार, सूत्रसंचालक, विक्रेते, व्यापारी - सर्वांना ती उपयुक्त आहे.

×

संपर्क

कार्यशाळा आयोजक खालीलप्रमाणे संपर्क करू शकतात..
इमेल : jyotiambekar@gmail.com
भ्रमणध्वनी : 9869043016 / 022 - 24953366

×

अमृत बोला

मुळात बोलणं ही अनैसर्गिक क्रिया आहे. म्हणजे ती जन्मत:च आपण घेऊन येत नाही. त्यामुळे ती प्रयत्नपूर्वक शिकावी आणि शिकवावी लागते. काहींना त्यांच्यातल्या उपजत गुणांमुळे चांगलं बोलता येतं, काहींना अनुकरण करीत प्रयत्नानं शिकावं लागतं. जसं काही थोड्या नशिबवान मंडळींना जन्मत:च सुरांचं ज्ञान असतं. बोलण्याचं तसंच आहे. निसर्गत: आपल्याला सुखकारक व ..